भजनी मालिका
← भजनांकडे परत

मायबाप सवें नये धनवित्त । करावे संचित भोगावे ते

mayabap saven naye dhanavitta | karave sanchit bhogave te

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
मायबाप सवें नये धनवित्त । करावे संचित भोगावे ते ॥१॥ म्हणवुनि लाभ काय तो विचारी । नको चालीवरी चित्त ठेवूं ॥ध्रु.॥ आयुष्य शेवटी सांडूनि जाणार । नव्हेचि साचार शरीर हें ॥२॥ तुका म्हणे काळें लावियेले माप । जमा धरी पापपुण्याचीही ॥३॥