भजनी मालिका

भजने

माझें माझे हातीं हीत । दिधलें संतमुनिश्वरीं ॥१॥ काय उत्तीर्ण होऊं कैसा । उपकारें आकाशा झांकोळिलें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

माझें मीपण देहीच मुरालें । प्रत्यक्ष देखिलें परब्रह्मा ॥१॥ परब्रह्मा सुखाचा सोहळा । पाहिलासे डोळां भरूनियां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

माझें मुख नामीं रंगो सर्वकाळ । गोविंद गोपाळ राम कृष्ण ॥१॥ अबद्ध चांगलें गाऊं भलतैसें । बाळ वडे जैसे मायबापा ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

माझे विषयीं तुज पडतो विसर । नको धरूं दूर पांडुरंगा ॥१॥ तुझा म्हणवितों हे चि लाज तुला । आतां झणी मला विसरेसी ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

माझें सर्व भाग्य केशवाचे पाय । आणिक उपाय नेणों आम्ही ॥१॥ पक्षी अवचित अंगणांत आला । घेऊनियां गेला सारा तेणें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

माझे हातीं आहे करावें चिंतन । तुम्ही कृपादान प्रेम द्यावें ॥१॥ मागति यां भांडवल आळवण । नामाची जतन दातियासी॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

माझ्या इंद्रियांसीं लागलें भांडण । म्हणतील कान रसना धाली ॥१॥ करिती तळमळ हस्त पाद भाळ । नेत्रांसी दुष्काळ पडिला थोर ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम