भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझे हातीं आहे करावें चिंतन । तुम्ही कृपादान प्रेम द्यावें

majhe hatin ahe karaven chintan | tumhi krupadan prem dyaven

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
माझे हातीं आहे करावें चिंतन । तुम्ही कृपादान प्रेम द्यावें ॥१॥ मागति यां भांडवल आळवण । नामाची जतन दातियासी॥ध्रु.॥ बाळक धांवोनि आड निघे स्तनीं ॥ घालावा जननी प्रेम पान्हां ॥२॥ तुका म्हणे करीं कासवाचे परी । आहे सूत्रदोरी तुझे हातीं ॥३॥