भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझें मीपण देहीच मुरालें । प्रत्यक्ष देखिलें परब्रह्मा

majhen mipan dehich muralen | pratyaksha dekhilen parabrahma

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
माझें मीपण देहीच मुरालें । प्रत्यक्ष देखिलें परब्रह्मा ॥१॥ परब्रह्मा सुखाचा सोहळा । पाहिलासे डोळां भरूनियां ॥२॥ ब्रह्माज्ञानाची तें उघडली पेटी । जाहलों असे पोटीं शीतल जाणा ॥३॥ एका जनार्दनीं ज्ञानाचें तें ज्ञान । उघड समाधान जाहलें जीवा ॥४॥