भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझे लेखीं देव मेला । असो त्याला असेल

majhe lekhin dev mela | aso tyala asel

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
माझे लेखीं देव मेला । असो त्याला असेल ॥१॥ गोष्ट न करी नांव नेघें । गेलों दोघें खंडोनी ॥ध्रु.॥ स्तुतिसमवेत निंदा । केला धंदा उदंड ॥२॥ तुका म्हणे निवांत ठेलों । वेचित आलों जीवित्व ॥३॥