भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझें माझ्या हाता आलें । आतां भलें सकळ

majhen majhya hata alen | atan bhalen sakal

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
माझें माझ्या हाता आलें । आतां भलें सकळ ॥१॥ काशासाठी विषम थारा । तो अंतरा विटाळ ॥ध्रु.॥ जालीं तया दुःखें तुटी । मागिल पोटीं नसावें ॥२॥ तुका म्हणे शुद्धकुळ । तेथें मळ काशाचा ॥३॥