भजनी मालिका

भजने

अवतार केला संहारावे दुष्ट । करिती हे नष्ट परपीडा ॥१॥ परपीडा करी दैत्य कंसराव । पुढें तो ही भाव आरंभिला ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

अवतार गोकुळीं हो जन तारावयासी । लावण्यरूपडें हे तेजपुंजाळरासी । उगवतां कोटि बिंबें रवि लोपले शशी । उत्साव सुरवरां मही थोर मानसीं ॥१॥ जय देवा कृष्णनाथा जय रखुमाईकांता। आरती ओंवाळीन तुम्हां देवकीसुता । जय देवा कृष्णनाथा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अवधियांशीं मार्गे संत झाले नाम्या ऐसें कोण बोले ।।१।। नामा जातां राउळासी देव बोले केवल सांगावें दासी जनीचें पद लिहावे ॥२॥

रचनाकार: संत जनाबाई

अवरोध विरोध करितां हरिभक्ति । सायुज्यता मुक्ति देणें तया ॥१॥ ऐसा कृपाळू लक्ष्मीच्या पती । पुराणें वर्णिती महिमा ज्याचा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अवश्य म्हणोनि चालिला अक्रूर । पाहियेलें पूर कौर-वांचें ॥१॥ धृतराष्ट्रा सांगे विवेकाच्या गोष्टी । फार तुझ्या पोटीं दुष्टबुद्धी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अविट बोलणें बोलावें अनादि । जें गुह्म वेदीं सांपडेना ॥१॥ कीर्ति पैं वैराग्य केलें सामराज्य । गुरुत्वासी लाज नाहीं आली ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अविट हें क्षीर हरीकथा माउली । सेविती सेविली वैष्णवजनीं ॥१॥ अमृत राहिलें लाजोनि माघारें । येणें रसें थोरें ब्रह्मानंदे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अविद्या निशींचा लोटला पहार । रजेंसी लोपला तम अंधकार । सत्व शोधित शुद्ध सुमनहार । प्रबोध पाहतां परतला कृष्ण वीरवो ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

अविनाश क्षेत्र पंढरी सर्वथा । आणीक ती वर्ता नये मना ॥१॥ सर्व तीर्थ मार्ग विधियुक्त आहे । येथें उभा पाहे पांडुरंग ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अविनाश नाम स्वयंभ संचलें । तें उभें चांगले विटेवर ॥१॥ वर्णितां वेदांसी न कळेचि पार । तें उभे साचार विटेवरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ