भजनी मालिका
← भजनांकडे परत

अविट बोलणें बोलावें अनादि । जें गुह्म वेदीं सांपडेना

avit bolanen bolaven anadi | jen guhma vedin sampadena

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अविट बोलणें बोलावें अनादि । जें गुह्म वेदीं सांपडेना ॥१॥ कीर्ति पैं वैराग्य केलें सामराज्य । गुरुत्वासी लाज नाहीं आली ॥२॥ नाशिवंत शरीर केलें अविनाश । घडविला विलास अध्यात्मींचा ॥३॥ अविट बोलणीं आठवती मनीं । आतां त्रिभुवनीं दिसेनात ॥४॥ तुझ्यामुळें हरि चालतो उगला । देहा आधीं गेला प्राण माझा ॥५॥ नामा म्हणे देवा करितां ऐसा घोर । सांडील शरीर निवृत्तिराज ॥६॥