भजनी मालिका
← भजनांकडे परत

अविद्येच्या वो रात्रीं । आडकलों अंधारीं

avidyechya vo ratrin | adakalon andharin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
अविद्येच्या वो रात्रीं । आडकलों अंधारीं ॥१॥ तेथुनी काढावें गोविंदा । यशोदेच्या परमानंदा ॥२॥ तुझें सन्निधेचे पाशीं । ठाव नाहीं अविद्येसी ॥३॥ तुझे संगती पावन । उद्धरिले ब्रम्हों पूर्ण ॥४॥ अजामेळ शुद्ध केला । म्हणे दासी जनी भला ॥५॥