भजनी मालिका
← भजनांकडे परत

अविट हें क्षीर हरीकथा माउली । सेविती सेविली वैष्णवजनीं

avit hen kshir harikatha mauli | seviti sevili vaishnavajanin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अविट हें क्षीर हरीकथा माउली । सेविती सेविली वैष्णवजनीं ॥१॥ अमृत राहिलें लाजोनि माघारें । येणें रसें थोरें ब्रह्मानंदे ॥ध्रु.॥ पतित पातकी पावनपंगती । चतुर्भुज होती देवाऐसे ॥२॥ सर्व सुखें तया मोहोरती ठाया । जेथें दाटणी या वैष्णवांची ॥३॥ निर्गुण हें सोंग धरिलें गुणवंत । धरूनियां प्रीत गाये नाचे ॥४॥ तुका म्हणे केलीं साधनें गाळणी । सुलभ कीर्तनीं होऊनी ठेला ॥५॥