भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवलोकिलें कृपादृष्टीं । केली वृष्टी वचनामृतें

avalokilen krupadrushtin | keli vrushti vachanamruten

रचनाकार: संत निळोबा · अभंग
अवलोकिलें कृपादृष्टीं । केली वृष्टी वचनामृतें ॥१॥ अंकुरले भावबीज । कारण निज अंतरीचें ॥२॥ संतांचि हे सहज स्थिती । आठव देती स्मरणाचा ॥३॥ निळा म्हणे धांवोनि येती । आणि उपदेशिती निज गुहा ॥४॥