भजनी मालिका
← भजनांकडे परत

अविद्येचे भ्रांतपण । मिथ्या दावी साच धन

avidyeche bhrantapan | mithya davi sach dhan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अविद्येचे भ्रांतपण । मिथ्या दावी साच धन ॥१॥ तेथ गुंतती लिगाडा । तेणें पडे पायीं खोडा ॥२॥ जन्ममाण भोंवरा । भ्रमें फिरसी निर्धारा ॥३॥ कळोनि कां रें वेडा होसी । एका जनार्दनीं न पाहसी ॥४॥