भजनी मालिका

भजने

जीवनमुक्त ज्ञानी झाले जरी पावन । त्यजावा दुर्जन संगति ही ॥१॥ बहुत अन्न विष मोहरीच्या मानें । अवघें चि तेणें विष होय ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

जीवनावांचूनि तळमळी मासा । प्रकार हा तैसा होतो जीवा ॥१॥ न सापडे जालें भूमिगत धन । चरफडी मन तयापरी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जीवन्मुक्त केलें नामाचे गजरीं । सेवेसी अधिकारी विठोबाचे ॥१॥ काय उतराई होउं तुज देवा । उदारा केशवा मायवापा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

जीवप्राणें एक विठ्ठालची व्हावा । ऐसिया मी भावा रातलिया ॥१॥ आवडे पंढरी आवडे चंद्रभागा । येती यमुनागंगा प्रतिदिनीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

जीवभाव जेणें अर्पियला देवा । तयाची ते सेवा देव करी ॥१॥ न म्हणे नीच अथवा उंचपण । भावासी कारण मुख्य देवा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जीवभाव त्याचा गेला अभिमान । म्हणऊनि जन हांसे कंसा ॥१॥ सावध करितां नये देहावरी । देखोनियां दुरि पळे जन ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

जीवाचा ही जीव तूंचि प्राणांचा प्राण । नयनाचेहि नयन तूंचि घ्राणाचे घ्राण ॥१॥ सर्वही इंद्रियभाव तूंचि माझे श्रीहरी । तुजविण न दिसे पाहतां मज मी माझारी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

जीवाचें जीवन अमृताची तनु । ब्रम्हांड भूषणु नारायण ॥१॥ सुखाचा सांगात अंतकासी अंत । निजांचा निवांत नारायण ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जीवाचें जीवन जनीं जनार्दन । नांदतो संपूर्ण सर्व देहीं ॥१॥ वाउगी कां वायां शिणती बापुडीं । काय तया जोडी हातीं लागे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जीवींचे गुज राही रुक्माईसी पुसे । न धरवे मज हांसे नवल वाटे ॥१॥ काय अभिश्राप आला देवराया । केली आपणया आत्मशुद्धी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

जीवींचे गुजगौप्य सांगेन वो तूतें । ऐक एकचित्तें मनोधर्मे ॥१॥ आवडते हे माझे भक्त परम सखे । जे सबाह्य सारिखे सप्रेमळ ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

जीवींचें जाणावें या नांवें आवडी । हेंकड तें ओढी अमंगळ ॥१॥ चित्ताच्या संकोचें कांहीं च न घडे । अतिशयें वेडे चार तोचि ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जीवें जीव नेणे पापी सारिखाचि । नळी दुजयाची कापूं बैसे ॥१॥ आत्मा नारायण सर्वां घटीं आहे । पशुमध्यें काय कळों नये ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम