भजनी मालिका
← भजनांकडे परत

जीवन्मुक्त केलें नामाचे गजरीं । सेवेसी अधिकारी विठोबाचे

jivanmukta kelen namache gajarin | sevesi adhikari vithobache

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जीवन्मुक्त केलें नामाचे गजरीं । सेवेसी अधिकारी विठोबाचे ॥१॥ काय उतराई होउं तुज देवा । उदारा केशवा मायवापा ॥२॥ अंतरीं देऊन प्रेमाचा जिव्हाळ । मुक्तीचा सोहळा भोगविसी ॥३॥ नामा म्हणे वेदां न येसी अनुमाना । वर्णितां पुराणां पडियेलें ठक ॥४॥