भजनी मालिका
← भजनांकडे परत

जीवाचें जीवन जनीं जनार्दन । नांदतो संपूर्ण सर्व देहीं

jivachen jivan janin janardan | nandato sampurna sarva dehin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जीवाचें जीवन जनीं जनार्दन । नांदतो संपूर्ण सर्व देहीं ॥१॥ वाउगी कां वायां शिणती बापुडीं । काय तया जोडी हातीं लागे ॥२॥ पंचाग्रि साधन अथवा धूम्रपान । तेणें काय संपूर्ण हरी जोडे ॥३॥ एका जनार्दनीं वाउगीं तीं तपें । मनाच्या संकल्पें हरी जोडे ॥४॥