भजनी मालिका
← भजनांकडे परत

जीवें जीव नेणे पापी सारिखाचि । नळी दुजयाची कापूं बैसे

jiven jiv nene papi sarikhachi | nali dujayachi kapun baise

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जीवें जीव नेणे पापी सारिखाचि । नळी दुजयाची कापूं बैसे ॥१॥ आत्मा नारायण सर्वां घटीं आहे । पशुमध्यें काय कळों नये ॥ध्रु.॥ देखत हा जीव हुंबरे वरडत । निष्ठुराचे हात वाहाती कैसे ॥२॥ तुका म्हणे तया चांडाळासी नर्क । भोगिती अनेक महादुःखें ॥३॥