भजनी मालिका
← भजनांकडे परत

जीवनमुक्त ज्ञानी झाले जरी पावन । त्यजावा दुर्जन संगति ही

jivanamukta dnyani jhale jari pavan | tyajava durjan sangati hi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जीवनमुक्त ज्ञानी झाले जरी पावन । त्यजावा दुर्जन संगति ही ॥१॥ बहुत अन्न विष मोहरीच्या मानें । अवघें चि तेणें विष होय ॥२॥ तुका म्हणे जेणें आपुलें स्वहित । तैसी करीं नीत विचारूनि ॥३॥