भवसिंधु तरावया । भजावें राया पंढरीच्या
bhavasindhu taravaya | bhajaven raya pandharichya
भवसिंधु तरावया । भजावें राया पंढरीच्या ॥१॥ करील तोचि तरणोपावों । दाविल ठावे निजाचा ॥२॥
bhavasindhu taravaya | bhajaven raya pandharichya
भवसिंधु तरावया । भजावें राया पंढरीच्या ॥१॥ करील तोचि तरणोपावों । दाविल ठावे निजाचा ॥२॥
bhavasindhu tyan payavat | mayaghat utarale
भवसिंधु त्यां पायवाट । मायाघाट उतरले ॥१॥ गर्जत विठोबाच्या नामें । गेले व्योमें निजपंथें ॥२॥
bhavabdhichen sakhol pani | budale prani bahusal
भवाब्धीचें सखोल पाणी । बुडाले प्राणी बहुसाल ॥१॥ येथें उतार न दिसे कोणा । थोरा लहाना नागवण ॥२॥
bhagya majhen ubhen thelen | santi davilen nidhan
भाग्य माझें उभें ठेलें । संती दाविलें निधान ॥१॥ आतां उणें कोठें कांही । न पडे ठायीं भरलेंसें ॥२॥
bhagyahin vdad | taya budhdi kari nad
भाग्यहीन व्दाड । तया बुध्दि करी नाड ॥१॥ सुख तें सन्मुख । तया तेंचि भासे दु:ख ॥२॥
bhagyachi ujari | dise yavari vodavali
भाग्याची उजरी । दिसे यावरी वोडवली ॥१॥ म्हणोनियां कृपावंत । झाले संत मायबाप ॥२॥
bhagyache te narinar | avalokiti nirantar
भाग्याचे ते नारीनर । अवलोकिती निरंतर ॥१॥ उजळूनियां ताटीं ज्योती । वधुवरांतें आवाळिती ॥२॥
bhagyen jode satsangati | jari hoy hatin sukruti
भाग्यें जोडे सत्संगती । जरि होय हातीं सुकृती ॥१॥ भाव शूध्द संचित गांठीं । तरीच भेटी तयांसवें ॥२॥
bhanudasache kuli mahavishnucha avatar | adi kshetri sthan vasti godatir
भानुदासाचे कुळी महाविष्णुचा अवतार । आदी क्षेत्री स्थान वस्ती गोदातीर ॥१॥ ओवाळु आरती स्वामी एकनाथा । तुमचे नाम घेता हरे भवभ्य चिंता ॥२॥
bhav bhakti vilasiya | parisa vinanti pandhariraya
भाव भक्ति विलासिया । परिसा विनंती पंढरीराया ॥१॥ आम्हां दासां सांभाळिजे । देउनी प्रेम गौरविजे ॥२॥
bhav bhakti bhagyavant | tayan sant bhetati
भाव भक्ती भाग्यवंत । तयां संत भेटती ॥१॥ येर ते भाग्यें जाती वायां न भजतां पायां संतांच्या वचनीं यांचे विश्वास धरिती । धन्य ते होती उभय लोकीं ॥२॥
bhav bhakticha bhukela | das dasancha ankila | na vaje duri ubha thela | avagha jhala tyanchachi
भाव भक्तीचा भुकेला । दास दासांचा अंकिला । न वजे दुरी उभा ठेला । अवघा झाला त्यांचाचि ॥१॥ भक्तवचनें ऐके कानीं । भक्त आवडी पाहे नयनीं । भक्त ह्रदयीं आलिंगुनी । निज ऐश्वर्य अर्पी त्यां ॥२॥
bhav shudhda tari | pragate yeuni antarin
भाव शुध्द तरी । प्रगटे येऊनि अंतरीं ॥१॥ उरों नेदी तया भिन्न । करी आपणा समान ॥२॥
bhavabhaktichiya pritin jevavila | deuni dhekar vo purnapanen ghala | nenon anandacha pravah lotala | aisiya svanandachin vachanen anuvadala vo
भावभक्तिचिया प्रीतीं जेवविला । देऊनि ढेकर वो पूर्णपणें घाला । नेणों आनंदाचा प्रवाह लोटला । ऐसिया स्वानंदाचीं वचनें अनुवादला वो ॥१॥ म्हणे केले ते पावले उपचार । तुम्ही आवडीनें प्रेमाचे प्रकार । झाली तृप्ति आतां घ्यावो देतों वर । पुन्हां नातळो हा तुम्हांसि संसार वो ॥२॥
bhavik goval
भाविक गोवळ । अंगी विश्वासाचें बळ ॥१॥
bhavikacha manobhav | pavavi dev sidhdi ha
भाविकाचा मनोभाव । पाववी देव सिध्दी हा ॥१॥ तेंचि सत्य बोलिलों बोलें । माझिया आलें स्वानुभावा ॥२॥
bhavikachi avadi deva | kari seva nij pritin
भाविकाची आवडी देवा । करी सेवा निज प्रीतीं ॥१॥ हिंडे तया मागें पुढें । नाशी कोडे सकळही ॥२॥
bhavikanchi uttam jati | vishvas dhariti santavachanin
भाविकांची उत्तम जाती । विश्वास धरिती संतवचनीं ॥१॥ तयां फळे त्यांचा भाव । प्रगटे देव हदयात ॥२॥
bhavikachen avaghenchi god | karuni kod svikari
भाविकाचें अवघेंचि गोड । करुनि कोड स्वीकारी ॥१॥ भोळा नाथ पंढरीचा । न करी दासाचा अतिक्रम ॥२॥
bhaven alavitan deva | lagala hatin junat theva | daiv modini ale daiva | sukh vishranti pavalon
भावें आळवितां देवा । लागला हातीं जुनाट ठेवा । दैव मोडीनी आले दैवा । सुख विश्रांती पावलों ॥१॥ आतां वेचूं खाऊं जेऊं । शोभती अळंकार ते लेऊं । आपुलें सुहद गौरवूं । हरिभक्त वैष्णव साबडे ॥२॥