भजनी मालिका
← भजनांकडे परत

भाव भक्ती भाग्यवंत । तयां संत भेटती

bhav bhakti bhagyavant | tayan sant bhetati

रचनाकार: संत निळोबा · अभंग
भाव भक्ती भाग्यवंत । तयां संत भेटती ॥१॥ येर ते भाग्यें जाती वायां न भजतां पायां संतांच्या वचनीं यांचे विश्वास धरिती । धन्य ते होती उभय लोकीं ॥२॥ निळा म्हणे या सज्जनापायीं । जीवभाव जिहीं समर्पिला ॥३॥