भजनी मालिका
← भजनांकडे परत

भवसिंधु त्यां पायवाट । मायाघाट उतरले

bhavasindhu tyan payavat | mayaghat utarale

रचनाकार: संत निळोबा · अभंग
भवसिंधु त्यां पायवाट । मायाघाट उतरले ॥१॥ गर्जत विठोबाच्या नामें । गेले व्योमें निजपंथें ॥२॥ परब्रम्हा वरावरी । भेटले हरि विश्वात्मया ॥३॥ निळा म्हणे जोडलीं पदें । ब्रम्हानंदें डुल्लती ॥४॥