भजनी मालिका
← भजनांकडे परत

भाग्याचे ते नारीनर । अवलोकिती निरंतर

bhagyache te narinar | avalokiti nirantar

रचनाकार: संत निळोबा · अभंग
भाग्याचे ते नारीनर । अवलोकिती निरंतर ॥१॥ उजळूनियां ताटीं ज्योती । वधुवरांतें आवाळिती ॥२॥ नित्य पंढरीचा वास । उपमा नाहीं त्या सुखास ॥३॥ निळा म्हणे वैकुंठवासी । नित्य हरि जयापाशीं ॥४॥