भजनी मालिका
संत ज्ञानेश्वर

संत ज्ञानेश्वर

तेराव्या शतकातील संत-कवी; ज्ञानेश्वरी व अमृतानुभव यांचे कर्ते.

संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेवर मराठीत ज्ञानेश्वरी ही टीका लिहिली. वारकरी संप्रदायाचा पाया रचणाऱ्या संतांमध्ये त्यांचे स्थान अग्रगण्य आहे. आळंदी येथे त्यांची संजीवन समाधी आहे.

या संतांची भजने

मदनमूर्ति विश्वीं अळंकारिली । ते डोळ्यां असुमाय जाली । पाहतां मनाची वृत्ति नुपुरे तेथिची सोय ।

मन मारुनि डोळां लेईलें । काळेपणें मिरवलें रुप त्यांचें ॥१॥ बरवें हें रुप काळें अमोलिक । म्हणोनि सांग जें शुध्दभावें ॥२॥

मन मुरडोनि डोळां लेइलें । काळेपणें मिरवलें रुप त्याचें ॥१॥ बरवें रुप काळें अमोलिक । म्हणोनियां सांगतसे शुध्द भावें ॥ध्रुव॥