भजनी मालिका

भजने

माझया मीपणचा करोनि फराळ । उरलें खावयासी बैसला सकळ । ऐसा भुकाळु हा नंदाचा गोवळ । यासि न पुरेचि ग्रासितां माझा खेळ वो ॥१॥ आतां काय देऊं नसंता जवळी । संचितप्रारब्ध तें भक्षिले समुळीं । कर्माकर्माच्या घेतल्या कवळी । विषयवासना त्या ग्रासिल्या निमिषमेळिं वो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

माझा कृष्ण देखिला काय । कोणी तरी सांगा गे ॥ धृ ॥ हाती घेऊनिया फूल । अंगणीं रांगत आलें मूल । हातें सारवित मी चूल । कैसी भूल पडियेली ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

माझा तंव अवघा खुंटला उपाय । रिता दिसे ठाव मजलागीं ॥१॥ करितोचि दिसे अवघेचि वाव । सुख दु:ख ठाव अधिकाधिक ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

माझा तंव खुंटला उपाव । जेणें तुझे आतुडती पाव । करूं भक्ती तरि नाहीं भाव । नाहीं हातीं जीव कवणेविशीं ॥१॥ धर्म करूं तरि नाहीं चित्त । दान देऊं तरि नाहीं वित्त । नेणें पुजों ब्राम्हण अतीत । नाहीं भूतदया पोटा हातीं ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

माझा तुह्मी देवा केला अंगीकार । हें मज साचार कैसें कळे ॥१॥ कां हो कांहीं माझ्या नये अनुभवा । विचारितां देवा आहें तैसा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

माझा देव्हारा साचा । नाहीं आणीक कोणाचा । त्रिभुवनीं याचा । ठसा न लगे पुसावें ॥१॥ या रे लोटांगणीं । कांहीं करा विनवणी । करील झाडणी । भूत काढी संसार ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

माझा नामा जंव नांवरूपा आला । जंव म्हणों लागला घरदार ॥१॥ तंव कैसें विघ्न उठिलें गे माये । नामा पंढरिरायें भुलविला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

माझा नामा जंव नांवरूपा आला जंब म्हणों लागला घरदार ||१|| तब कैसें विघ्न उठिलें गे माये। नामा पंढरिरायें भुलविला ||२||

रचनाकार: संत गोणाई