भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझा नामा मज देईं । जीव देईन तुझे पायीं

majha nama maj dein | jiv dein tujhe payin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
माझा नामा मज देईं । जीव देईन तुझे पायीं ॥१॥ पुंडलिका भुलविलें । तैसें माझिया बाळा केलें ॥२॥ तें गा न चले मजपाशीं । दे गा माझ्या नामयासी ॥३॥ तुझ्यासंगें जे जे गेले । ते त्वां जितेचि मारीले ॥४॥ विठ्ठल म्हणे गोणाबाई । नामा तुझा घेवोनी जाईं ॥५॥ हातीं धरोनियां आली । दासी जनी आनंदली ॥६॥