भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझा नामा मज देई । जीव देईन तुझे पायीं

majha nama maj dei | jiv dein tujhe payin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
माझा नामा मज देई । जीव देईन तुझे पायीं ॥१॥ पुंडलिका भुलविलें । तैसें माझें बाळ केलें ॥२॥ तें गा न चले मजपासीं । दे गा माझ्या नामयासी ॥३॥ तुज संगतीं जे लागले । ते त्वां जितेंचि मारिले ॥४॥ विठ्ठल म्हणे गोणाई । आपुला नामा घेऊनी जाई ॥५॥ हातीं धरोनियां गेली । गोणाई तेव्हां आनंदली ॥६॥