भजनी मालिका

भजने

भक्तांसी सान न धरीच मान । खाय भाजीपान भाविकांचें ॥१॥ उच्छिष्टांची आस धरुनिया जीवीं । गोकुळीं तें दावी चोज सर्व ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भक्तांहून देवा आवडते काइ । त्रिभुवनीं नाहीं आन दुजें ॥१॥ नावडे वैकुंठ क्षीराचा सागर । धरोनि अंतर राहे दासा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भक्ति असो मुक्ति घाला रे बाहेरी । बहुतां चाळविलें चाळायाची थोरी ॥१॥ भक्ति ते राहो मुक्ति ते जावो । मुक्तिमाजीं भावो नाहीं नाहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भक्ति करुनियां कोण वायां गेला । सांगा हो विठ्ठला निवडुनि ॥१॥ द्वापाराचे अंती नामची सुकृत । अद्यापि निश्चित चालतसे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

भक्ति गोकुळी नवविधा नारी । गजरे चालती भारी वो । सुनीळ जळीं अति संतोषं । क्रीडाती यमुनातीरीं वो ॥१॥ स्थिर स्थिर माधवा विआर धरीं । आम्हीं परात्पर परनारी । वासना वास अलक्ष लक्षोणी । दह्माची करिसी चोरी रे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भक्ति ते कठीण इंगळाची खाई। रिपर्णे त्या डोहीं कठीण असे ।।१।। भक्ति ते कठीण विषग्रास घेणें उदास में होणें जीवें भावें ॥२॥

रचनाकार: संत जनाबाई

भक्ति त्रिविधा षड्‌विध नवविधा । यजन याजनें जीवातें दंडिताती सदा ॥१॥ केशव परमात्मा नेणोनि याजी पतितें । पतनीं पडतां होती भूतें रया ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

भक्ति नाहीं नामीं तो चांडाळ पतीत । तोचि जाणावा कुश्चित नष्ट येथें ॥१॥ प्रपंचकर्दमीं बुडोनियां ठेले । संताविण उगले फजीत होती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भक्तिं भावचि बांधिला गांठी । आला उठाउठीं देव तेथें ॥१॥ म्हणे मज घ्या सोडायसी । ते म्हणती ठकिसी नेघों तुज ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

भक्ति हेंचि भाण परब्रह्म पक्वान्न । गुरुमुखें जेवण येवियेलें ॥१॥ अनुभव भात लयालक्ष कढी । जेवणारा गोडी घेत असे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

भक्तिप्रतापें पावलों मी सुपंथ । सफळ निश्चित पर-मार्थ ॥१॥ देवा सर्वांभूतीं असतां प्रगट । निर्वाणीं चोखट भक्ति जाण ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

भक्तिप्रतिपाळे दीन वो वत्सळे । विठ्ठले कृपाळे होसी माये ॥१॥ पडिला विसर माझा काय गुणें । कपाळ हें उणें काय करूं ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम