भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्तांसी सान न धरीच मान । खाय भाजीपान भाविकांचें

bhaktansi san na dharich man | khay bhajipan bhavikanchen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भक्तांसी सान न धरीच मान । खाय भाजीपान भाविकांचें ॥१॥ उच्छिष्टांची आस धरुनिया जीवीं । गोकुळीं तें दावी चोज सर्व ॥२॥ खेळे विटिदांडुं हमामा हुंबरी । वाजवी मोहरी सवंगडियासी ॥३॥ एका जनार्दनीं भक्तांचा अंकित । म्हणोनि तिष्ठत उभा असे ॥४॥