भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्ति आनंद । मज करी गा नारायणा

bhakti anand | maj kari ga narayana

रचनाकार: संत बोधले · अभंग
भक्ति आनंद । मज करी गा नारायणा । हेचि माझ्या मना आवडी मोठी ॥१॥ देवा आवडी मनाची । तुझिये भेटीची । आणिक कोणाची । नाही चाड ॥२॥ जनक जननी । तु आमचा धणी । ठाव मज चरणी । देई बापा ॥३॥ बोधला म्हणे मज । आणिक नाही काज । तुझीया चरणीचा रज । होईन बापा ॥४॥