भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्ति नाहीं नामीं तो चांडाळ पतीत । तोचि जाणावा कुश्चित नष्ट येथें

bhakti nahin namin to chandal patit | tochi janava kushchit nashta yethen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भक्ति नाहीं नामीं तो चांडाळ पतीत । तोचि जाणावा कुश्चित नष्ट येथें ॥१॥ प्रपंचकर्दमीं बुडोनियां ठेले । संताविण उगले फजीत होती ॥२॥ पुत्र मित्र कांता मानुनी भरंवसा । याचा मोह खासा जन्मवरी ॥३॥ एका जनार्दनीं अंतीं आहे कोण । न कळे संताविण निश्चयेंसी ॥४॥