भजनी मालिका

भजने

देवावीण भक्तांचें संकट । कोणतें अरिष्ट निवारित ॥१॥ कोणासी शरण जातें तेव्हां । कळिकाळ जेव्हां आकळूं येतां ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

देवासाठी जाणा तयासी च आटी । असेल ज्या गांठीं पुण्यराशी ॥१॥ निर्बळा पाठवी बळें वाराणसी । मेला आला त्यासी अर्ध पुण्य ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

देवासी अवतार भक्तांसी संसार । दोहींचा विचार एकपणें ॥१॥ भक्तांसी सोहळे देवाचिया अंगें । देव त्यांच्या संगें सुख भोगी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

देवासी आवडे भक्तसमागम । त्यांचें सर्व काम करी अंगें ॥१॥ भक्ताकाजालागीं अवतार धरी । नांदे भक्तांघरीं स्वयें देव ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देवासी कांहीं नेसणें नसे । जेथें तेथें देव उघडांची दिसे ॥१॥ देव निलाजरा देव निलाजरा । देव निलाजरा पाहा तुम्हीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देवासी तुष्टण्या एक युक्ति आहे । रामनाम गाय मुखीं सदा ॥१॥ काया वाचा मनें संतासींशरण । तेणें नारायण तुष्ट होय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देवासी तो पुरे एक प्रेमभाव । पूजा अर्चा वाव सर्व जाणा ॥१॥ मनापासूनियां करितां कीर्तन । आनंदें नर्तन गातां गीत ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देवासी तो पुरे एकभाव गांठी । तोचि त्याचे मिठी देईल पायीं ॥१॥ पाहोनि राहीन कवतुक निराळा । मी मज वेगळा होऊनियां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

देवासी तो प्रिय एक नाम आहे । म्हणोनि तूं गाये सदोदित ॥१॥ कला हें कौशल्या अवघे विकळ । मंगळां मंगळ रामनाम ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देवासी तो भाव पुरे । तेणें देव सदा झुरे । भक्तलागीं सरे । वैकुंठासी ॥१॥ भाव धरावा बळकट । आणिक नको कांही कष्ट । साधन हें श्रेष्ठ । कलीमाजीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देवासी तो मुख्य कीर्तनाची गोडीं । म्हणोनियां उडी घाली स्वयें ॥१॥ नावडे तया आणिक संकल्प । कीर्तनीं विकल्प करितां क्षोभे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ