भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवासी अवतार भक्तांसी संसार । दोहींचा विचार एकपणें

devasi avatar bhaktansi sansar | dohincha vichar ekapanen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देवासी अवतार भक्तांसी संसार । दोहींचा विचार एकपणें ॥१॥ भक्तांसी सोहळे देवाचिया अंगें । देव त्यांच्या संगें सुख भोगी ॥ध्रु.॥ देवें भक्तां रूप दिलासे आकार । भक्तीं त्याचा पार वाखाणिला ॥२॥ एका अंगीं दोन्ही झालीं हीं निर्माण । देवभक्तपण स्वामिसेवा ॥३॥ तुका म्हणे येथें नाहीं भिन्नभाव । भक्त तोचि देव देव भक्त ॥४॥