भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवासी तो पुरे एक प्रेमभाव । पूजा अर्चा वाव सर्व जाणा

devasi to pure ek premabhav | puja archa vav sarva jana

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देवासी तो पुरे एक प्रेमभाव । पूजा अर्चा वाव सर्व जाणा ॥१॥ मनापासूनियां करितां कीर्तन । आनंदें नर्तन गातां गीत ॥२॥ रामकृष्णहरि उच्चार सर्वदा । कळिकाळ बाधा तेणें नोहे ॥३॥ एका जनार्दनीं हाचि पैं विश्वास । सर्वभावें दास होईन त्याचा ॥४॥