भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवासी तो पुरी एक भाव । नेणें वैभव दासाचें

devasi to puri ek bhav | nenen vaibhav dasachen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देवासी तो पुरी एक भाव । नेणें वैभव दासाचें ॥१॥ जया चित्तीं जी वासना । तैशीं कामना पुरवणें ॥२॥ नाहीं पडत गोंवोंगुती । आपणचि हातीं करितुसे ॥३॥ एका जनार्दनीं अंकित राहे । तिष्ठत द्वारीं त्याच्या ॥४॥