भजनी मालिका
← भजनांकडे परत

देवासी तो मुख्य कीर्तनाची गोडीं । म्हणोनियां उडी घाली स्वयें

devasi to mukhya kirtanachi godin | mhanoniyan udi ghali svayen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देवासी तो मुख्य कीर्तनाची गोडीं । म्हणोनियां उडी घाली स्वयें ॥१॥ नावडे तया आणिक संकल्प । कीर्तनीं विकल्प करितां क्षोभे ॥२॥ साबडे भाळे भोळे नाचताती रंगी । प्रेम तें अंगी देवाचिये ॥३॥ एका जनार्दनीं धांवे लवलाहे । न तो कांहीं पाहे आपणातें ॥४॥