भजनी मालिका

भजने

देखिला सुदामा आपुल्या नयनीं । मग चक्रपाणी उठे त्वरें ॥१॥ सिंहासना खालीं टाकोनियां उडी । कर द्वय जोडी नमनालागीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देखिलें कंदर्पाच्या बापा । आम्हीं नेणों पुण्य पापा ॥१॥ कैंचे पाप कैंचे पुण्य । देह नामें पडलें शून्य ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देखीचा दिमाख शिकोनियां दावी । हि†ऱ्या ऐसी केवीं गारगोटी ॥१॥ मर्यादा ते जाण अरे अभागिया । देवाच्या ऐसिया सकळ मूर्ती ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

देखीचें तें ज्ञान करावें तें काई । अनुभव नाहीं आपणासी ॥१॥ इंद्रियांचे गोडी ठकलीं बहुतें । सोडितां मागुतें आवरेना ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

देखे देखे ग जशोदा मायछे । तोरे छोरींयानें मुजें गारी देवछे ॥१॥ जमूनाके पानीयां मैं ज्यावछे । बीच मीलके घागरीया फोडछे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देखों तितकें आहे ब्रह्मा । वायां सांडीं कीं भवभ्रम ॥१॥ पोटीं नाहीं परमार्थ । धरिती स्वार्थाचा अर्थ ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देखोनि तें यशोदा ऐकोनि गोठी । क्रोधें संतप्त झाली पोटीं । म्हणे हा चोरिया करितां महा हाटीं । न राहेचि मी काय करुं ॥१॥ किती तरी हे अपवाद । सोसूं जनाचे वेवाद । उदंड सांगताहि हा गोविंद । न सांडीचि खोडी आपुली ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

देखोनि पुराणिकांची दाढी । रडे स्फुंदे नाक ओढी ॥१॥ प्रेम खरें दिसे जना । भिन्न अंतरीं भावना ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

देखोनि हरखली अंड । पुत्र जाला म्हणे रांड । तंव तो जाला भांड । चाहाड चोरटा शिंदळ ॥१॥ जाय तिकडे पीडी लोकां । जोडी भांडवल थुंका । थोर झाला चुका । वर कां नाहीं घातली ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

देखोनियां तुझ्या रूपाचा आकार । उभा कटीं कर ठेवूनियां ॥१॥ तेणें माझ्या चित्ता होतें समाधान । वाटतें चरण न सोडावे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

देखोनियां त्याचा अंतर्भाव । वोळला देव कृपासिंधु ॥१॥ येऊनि जवळी ह्रदयीं धरी । आणि मुखीं भरी ब्रम्हारस ॥२॥

रचनाकार: संत निळोबा