भजनी मालिका
← भजनांकडे परत

देखोनियां तुझ्या रूपाचा आकार । उभा कटीं कर ठेवूनियां

dekhoniyan tujhya rupacha akar | ubha katin kar thevuniyan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देखोनियां तुझ्या रूपाचा आकार । उभा कटीं कर ठेवूनियां ॥१॥ तेणें माझ्या चित्ता होतें समाधान । वाटतें चरण न सोडावे ॥ध्रु.॥ मुखें गातों गीत वाजवितों टाळी । नाचतों राउळीं प्रेमसुखें ॥२॥ तुका म्हणे केले तुझ्या नामापुढें । तुच्छ हें बापुडें सकळही ॥३॥