भजनी मालिका
← भजनांकडे परत

देखिलासि माती खातां । दावियानें बांधी माता

dekhilasi mati khatan | daviyanen bandhi mata

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देखिलासि माती खातां । दावियानें बांधी माता ॥१॥ जाळी घेउनि कांबळी काठी । गाई वळी वेणु पाठीं ॥ध्रु.॥ मोठें भावार्थाचें बळ । देव झाला त्याचें बाळ ॥२॥ तुका म्हणे भक्तासाठीं । देव धांवे पाठोपाटीं ॥३॥