भजनी मालिका
← भजनांकडे परत

देखीचें तें ज्ञान करावें तें काई । अनुभव नाहीं आपणासी

dekhichen ten dnyan karaven ten kai | anubhav nahin apanasi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देखीचें तें ज्ञान करावें तें काई । अनुभव नाहीं आपणासी ॥१॥ इंद्रियांचे गोडी ठकलीं बहुतें । सोडितां मागुतें आवरेना ॥ध्रु.॥ युक्तीचा आहार नीतीचा वेव्हार । वैराग्य तें सार तरावया ॥२॥ नाव रेवाळितां घाला घाली वारा । तैसा तो पसारा अहंतेचा ॥३॥ तुका म्हणे बुद्धी आपुले अधीन । करी नारायण आतुडे तों ॥४॥