भजनी मालिका

भजने

जालों म्हणती त्याचें मज वाटे आश्चर्य । ऐका नव्हे धीर वचन माझें ॥१॥ शिजलिया अन्ना ग्वाही दांत हात । जिव्हेसी चाखत न कळे कैसें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जाळा तुम्ही माझें जाणतें मीपण । येणें माझा खुण मांडियेला ॥१॥ खादलें पचे तरि च तें हित । ओकलिया थीत पिंड पीडी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जावें बाहेरी हा नाठवे विचार । नाहीं समाचार ठावा कांहीं ॥१॥ कांहीं न कळे तें कळों आलें देवा । मांडिला रिघावा कवतुक ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

जावोनी राउळा जोडूनियां हात बोले ज्ञानेश्वर विठोबासी।।१॥ करावीं हीं तीर्थे आवड अंतरीं। घ्यावें बरोबरी नामदेवा। २॥

रचनाकार: संत जनाबाई

जाश्वनीळ सदा ध्याये ध्यानीं मनीं । बैसोनी स्मशानीं निवांतपणें ॥१॥ तें हें उघडें रुप विठ्ठ्ल साचार । निगमांचे माहेर पंढरी हें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जाहला अस्तमान आले गोकूळां । वोवाळिती आरत्या गोपिका बाळां ॥१॥ जाती सवंगंडी आपुलाले घरां । राकाकृष्ण दोघे आले मंदिरां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जाहली गेली तुटली खुंटली हाव । पहातां पाहणें एकचि जाहला देव ॥१॥ जंगम स्थावर अचळ चळाचळ । अवघा व्यापुनी राहिला अकळ ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जिकडे जाय तिकडे सवें । आतां यावे यावरी ॥१॥ माझ्या अवघ्या भांडवला । तू एकला जालासी ॥ध्रु.॥ आतां दुजे धरा झणी । पायां हुनी वेगळे ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

जिकडे जावें तिकडे देवाचि सांगातें । ऐसें केलें नाथें पंढरीच्या ॥१॥ शब्द तिथें झाला समूळचि वाव । गेला देहभाव हारपोनी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जिकडे जिकडे भासे रवी । प्रभा नीच नवी सांगातें ॥१॥ तैसें केलें माझें वाचें । तुम्हीं सामार्थ्याचें बोलणें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा