भजनी मालिका
← भजनांकडे परत

जावोनियां नामदेव । बोले गणोबासी भाव

javoniyan namadev | bole ganobasi bhav

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जावोनियां नामदेव । बोले गणोबासी भाव ॥१॥ द्र्व्य द्यावें हो सत्वरीं । आम्हीं जातों आपुल्या घरीं ॥२॥ मग म्हणे धोंडोबासी । तुम्ही जामीन ऐवजासी ॥३॥ द्र्व्य द्यावें हो लवकरीं । नाहीं तरी चलावें घरीं ॥४॥ ऐसें बोलोनि धोंडोबासी । पुढें लोटिलें तयासी ॥५॥ नामा पंढरिसी आला । संगें धोंडोबा आणिला ॥६॥