भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाहला अस्तमान आले गोकूळां । वोवाळिती आरत्या गोपिका बाळां

jahala astaman ale gokulan | vovaliti aratya gopika balan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जाहला अस्तमान आले गोकूळां । वोवाळिती आरत्या गोपिका बाळां ॥१॥ जाती सवंगंडी आपुलाले घरां । राकाकृष्ण दोघे आले मंदिरां ॥२॥ नानापरीचीं पक्कान्नें वाढिती भोजना । यशोदा रोहिणी राम आणि कृष्णा ॥३॥ एका जनार्दनीं पहुडले देव । गोकुळामाजीं दावी ऐसें लाघव ॥४॥