भजनी मालिका
← भजनांकडे परत

जिकडे जिकडे भासे रवी । प्रभा नीच नवी सांगातें

jikade jikade bhase ravi | prabha nich navi sangaten

रचनाकार: संत निळोबा · अभंग
जिकडे जिकडे भासे रवी । प्रभा नीच नवी सांगातें ॥१॥ तैसें केलें माझें वाचें । तुम्हीं सामार्थ्याचें बोलणें ॥२॥ उजळिल्या दाहीं दिशा । करुनी प्रकाशा निजबोधें ॥३॥ निळा म्हणे सत्या चाली । वाट दाविली तुम्हीं ते ॥४॥