भजनी मालिका
← भजनांकडे परत

जालों म्हणती त्याचें मज वाटे आश्चर्य । ऐका नव्हे धीर वचन माझें

jalon mhanati tyachen maj vate ashcharya | aika navhe dhir vachan majhen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जालों म्हणती त्याचें मज वाटे आश्चर्य । ऐका नव्हे धीर वचन माझें ॥१॥ शिजलिया अन्ना ग्वाही दांत हात । जिव्हेसी चाखत न कळे कैसें ॥ध्रु.॥ तापलिया तेला बावन चंदन । बुंद एक क्षण शीतळ करी ॥२॥ पारखी तो जाणे अंतरींचा भेद । मूढजना छंद लावण्यांचा ॥३॥ तुका म्हणे कसीं निवडे आपण । शुद्ध मंद हीन जैसें तैसें ॥४॥