भजनी मालिका

भजने

खवळलें आतां न भियेंरे तुज । सांडियेली लाज लौकिकाची ॥१॥ आम्हीं दीन सिंपे यातीचे हो हीन । दे माझें ठेवणें केशाराजा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

खवळलों आतां न भिये रे तुज । सांडिली रे लाज लौकिकाची ॥१॥ आम्ही दीन सिंपे यातिचे ते हीन । दे माझें ठेवणें केशीराजा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

खाटिकाप्रमाणें करिसी व्यापार । मनीं निरंतर धरो नियां ॥१॥ दुष्ट दुचाचारी दुर्बळ घातकी । परम नाशकी पापिष्ट तो ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

खांद्यावरी पांवा कस्तुरीचा टिळा । चालत गोपाळ गाईमागें ॥१॥ यमुने पाबळीं गोपां पाचारीत । सिदोर्‍या शोभत पाठीवरी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

खांद्यावरे कांबळी हातामधीं काठी । चारितसे धेनु सांवळा जगजेठी ॥१॥ राधे राधे राधे राधे मुकुंद मुरारी । वाजवितो वेणु कान्हा श्रीहरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

खांबसूत्रीं खेळवीं दोरी । नाचती पुतळया दिसती वरी ॥१॥ तैसा बोलवी बोलतां । न दिसे परि तो मज आतौता ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

खिस्तीचा उदीम उदिमांत हीन । करिती ब्राम्हण कलीयुगीं ॥१॥ वेवसाव करितां पर्वत मांगासी । ते पैं विटाळासी न मनिती ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

खुंटलासे शब्द बोलतां आनंद । सर्व बह्मानंद कोंदाटला ॥१॥ तें हें दत्तनाम आवडी आदरें । उच्चारी सोपारें सर्वकाळ ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ