भजनी मालिका
← भजनांकडे परत

खाती आपण जें जेविती । तेंचि आणिकांही वाढिती

khati apan jen jeviti | tenchi anikanhi vadhiti

रचनाकार: संत निळोबा · अभंग
खाती आपण जें जेविती । तेंचि आणिकांही वाढिती ॥१॥ आजि बहुता भाग्यें भेटी । झाली चरणीं पडली मिठी ॥२॥ नाहींचि आम्हांसी वंचिलें । निज गुज अवघेंचि आपुलें ॥३॥ निळा म्हणे कृपावंत । केलें अनाथा सनाथ ॥४॥