भजनी मालिका
← भजनांकडे परत

खुंटलासे शब्द बोलतां आनंद । सर्व बह्मानंद कोंदाटला

khuntalase shabda bolatan anand | sarva bahmanand kondatala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
खुंटलासे शब्द बोलतां आनंद । सर्व बह्मानंद कोंदाटला ॥१॥ तें हें दत्तनाम आवडी आदरें । उच्चारी सोपारें सर्वकाळ ॥२॥ कलिमाजीं सोपें दत्तनाम घेतां । संसाराची वार्ता उरी नुरे ॥३॥ एका जानार्दनीं लागलासे छंद । दत्तनामे आनंद सर्वकाळ ॥४॥