भजनी मालिका
← भजनांकडे परत

खांद्यावरे कांबळी हातामधीं काठी । चारितसे धेनु सांवळा जगजेठी

khandyavare kambali hatamadhin kathi | charitase dhenu sanvala jagajethi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
खांद्यावरे कांबळी हातामधीं काठी । चारितसे धेनु सांवळा जगजेठी ॥१॥ राधे राधे राधे राधे मुकुंद मुरारी । वाजवितो वेणु कान्हा श्रीहरी ॥२॥ एका एक गौळनी एकएक गोपाळा । हातीं धरुनि नाचती रासमंडळा ॥३॥ एका जनार्दनी रासमडळ रचिलें । जिकडे पाहे तिकडे अवघें ब्रह्मा कोंदलें ॥४॥