होऊनि हरण राहिला ते वनीं । दोघी त्या हरिणी स्रिया झाल्या
houni haran rahila te vanin | doghi tya harini sriya jhalya
होऊनि हरण राहिला ते वनीं । दोघी त्या हरिणी स्रिया झाल्या ॥१॥ जातीच्या स्वभावें करिती विहार । चित्त झालें स्थिर एकमेकां ॥२॥
houni haran rahila te vanin | doghi tya harini sriya jhalya
होऊनि हरण राहिला ते वनीं । दोघी त्या हरिणी स्रिया झाल्या ॥१॥ जातीच्या स्वभावें करिती विहार । चित्त झालें स्थिर एकमेकां ॥२॥
houniyan tuhmi vaninchin vanacharen | bolatasan phar dharma-dharma
होऊनियां तुह्मी वनींचीं वनचरें । बोलतसां फार धर्मा-धर्म ॥१॥ येणें कांहीं कांहीं द्रव आला मना । तुमची भावना कोण जाणे ॥२॥
houniyan techi rahile nivant | rupin akhandit houni sant
होऊनियां तेचि राहिले निवांत । रुपीं अखंडित होउनी संत ॥१॥ नित्य निरामय अखंड अव्दय । ध्याती देवत्रय ज्यातें सदा ॥२॥
houniyan vishnubhakta | shivaninda jo karit
होऊनियां विष्णुभक्त । शिवनिंदा जो करीत ॥१॥ तोची अधम चांडाळ । महादोषी अमंगळ ॥२॥
houni abhari | rahilase dvarin
होऊनी आभारी । राहिलासे द्वारीं ॥१॥ समचरण विटेवरी । कटीं धरुनियां कर ॥२॥
houni vaishnav | jo kan nindi sadashiv
होऊनी वैष्णव । जो कां निंदी सदाशिव ॥१॥ त्याचें न पहावें वदन । मुर्खाहुनी मुर्ख पूर्ण ॥२॥
honar janar na chuke kalpantin vaugi | kunthakunthi karuni kay
होणार जणार न चुके कल्पांतीं वाउगी । कुंथाकुंथी करुनी काय ॥१॥ लिहिलें संचितें न चुके कल्पांतीं । वाउगाचि भ्रांतीं फळ काय ॥२॥
hotan dvarapal laj vate thori | na sahe bhikari jala hari
होतां द्वारपाल लाज वाटे थोरी । न साहे भिकारी जाला हरी ॥१॥ बळीच्या तो द्वारी सारथीं पर्थाचा । गोसावी आमुचा वेदवाणी ॥२॥
hota prat:kal sangatase taya | javen yethoniyan shighra atan
होता प्रात:काळ सांगतसे तया । जावें येथोनियां शीघ्र आतां ॥१॥ क्षणोक्षणा पाहाती देवाजीचें मुख । येती सक-ळीक गोकुळासी ॥२॥
hotin nenon jalin kathinen kathin | javali cha man manen gvahi
होतीं नेणों जालीं कठिणें कठीण । जवळी च मन मनें ग्वाही ॥१॥ आह्मी होतों सोइ सांडिला मारग । घडिलें तें मग तिकून ही ॥ध्रु.॥
hoti potasathin sant | nahin het viththali
होती पोटासाठीं संत । नाहीं हेत विठ्ठली ॥१॥ तयांचा उपदेश नये कामा । कोण धर्मा वाढवी ॥२॥
hoten taisen pani kelen nivedan | antaralon din bahut hoton
होतें तैसें पांई केलें निवेदन । अंतरलों दीन बहुत होतों ॥१॥ संबोखून केले समाधान चित्ता । वोगरुनि भाता प्रेमरस ॥२॥
hoten purvarjit | uttam sangrahin sanchit
होतें पूर्वार्जित । उत्तम संग्रहीं संचित ॥१॥ तेंचि उत्तीर्णत्वालागीं । झालें सन्मुख ये प्रसंगीं ॥२॥
hoten bahut divas arta vagavilen | aji akatmat ten phal deun alen | drushti shriharichi dekhilin paulen | ghetalen janma magen sarthak tyanche jhalen vo
होतें बहुत दिवस आर्त वागविलें । आजी अकत्मात तें फळ देऊं आलें । दृष्टी श्रीहरीची देखिलीं पाऊलें । घेतलें जन्म मागें सार्थक त्यांचे झालें वो ॥१॥ धन्य हे आनंदाची सापडली वेळ । तेणें संत सज्जन भेटले कृपाळ । त्यांनींचि फेडियेला बुध्दीचा वो मळ । दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ वो ॥२॥
hoten bahut divas manasin | aji navas he phalale navasin
होतें बहुत दिवस मानसीं । आजि नवस हे फळले नवसीं । व्हावी भेटी ते झाली गोविंदासीं । आतां सेवा करीन निश्चयेसीं वो ॥१॥
hoten leuniyan atinche anjan | tenen dekhilen vo nikshepichen dhan | hoten vedarayen thevilen jodun | tenchi sampadalen aiten nidhan von
होतें लेउनियां आतींचे अंजन । तेणें देखिलें वो निक्षेपीचें धन । होतें वेदरायें ठेविलें जोडून । तेंचि सांपडलें आईतें निधान वों ॥१॥ जनीं जनार्दन प्रत्यक्षचि होता । तोचि मुसावोनि कृष्ण झाला आतां । मंडित चतुर्भज वेणुवाजविता । मुकुट कुंडले वो माळाचा मिरवता वो ॥२॥
hote vaikanthiche konin
होते वैकंठीचे कोनीं । शिरले अयोध्याभुवनी लागे कौसल्येचे स्तनीं ।
hoton ten chintit manasin | navas phalale navasin | jodite narayana aisi | avit jyasi nash nahin
होतों तें चिंतीत मानसीं । नवस फळले नवसीं । जोडिते नारायणा ऐसी । अविट ज्यासी नाश नाहीं ॥१॥ धरिले जीवीं न सोडीं पाय । आलें या जीवित्वाचें काय । कैं हे पाविजेती ठाय । लाविली सोय संचितानें ॥ध्रु.॥
hoton sampadalon vethi | jatan bheti sansara
होतों सांपडलों वेठी । जातां भेटी संसारा ॥१॥ तों या वाटे कृपा केली । भेटी जाली विठोबासी ॥ध्रु.॥
hoy antari palat | karitan path harinamen
होय अंतरी पालट । करितां पाठ हरिनामें ॥१॥ देवा ऐसे देवचि होती । जे या भजती विठठला ॥२॥