सोरटीचा देव माणदेशी आला । भक्तीसी पावला सावकाश
soraticha dev manadeshi ala | bhaktisi pavala savakash
सोरटीचा देव माणदेशी आला । भक्तीसी पावला सावकाश ।। सावकाश जाती देवाचे यात्रेसी होति पुण्यराशी भक्तिभावें ।।
soraticha dev manadeshi ala | bhaktisi pavala savakash
सोरटीचा देव माणदेशी आला । भक्तीसी पावला सावकाश ।। सावकाश जाती देवाचे यात्रेसी होति पुण्यराशी भक्तिभावें ।।
sorat alon tumachya namen | puren gramen thakit
सोरत आलों तुमच्या नामें । पुरें ग्रामें ठाकित ॥१॥ आंतां चरण दावा दिठी । घाला कंठी निर्माल्य ॥२॥
soliv jen sukh atisukhahuni | ubhen ten anganin vaishnavanchya
सोलीव जें सुख अतिसुखाहुनि । उभें तें अंगणीं वैष्णवांच्या ॥१॥ वृंदावन सडे चौक रंग माळा । नाचे तो सोहोळा देखोनियां ॥ध्रु.॥
solinv brahmadnyan sangat je goshti | ten ughad nache drushti santasangen
सोलींव ब्रह्माज्ञान सांगत जे गोष्टी । तें उघड नाचे दृष्टी संतासंगें ॥१॥ गळां तुळशीहार मुद्रांचें श्रृंगार । नामाचा गजर टाळ घोळ ॥२॥
sola kali chandra purnime purna bodhu
सोळा कळि चंद्र पूर्णिमे पूर्ण बोधु । संतजना उद्वोधु सागरन्यायें ॥१॥
sola tya samadhi aut pitha majhari | tethen nar- hari dev nande
सोळा त्या समाधि औट पीठा माझारी । तेथें नर- हरि देव नांदे ॥१॥ बारा गुंफे माजीं भ्रमर गुंफे मध्यें । तेथें आत्मा शुद्ध ज्ञान नांदे ॥२॥
sola sahastra gopi bhoguni bahmachari | aishi agadh kirti tumachi shrihari
सोळा सहस्त्र गोपी भोगुनी बह्माचारी । ऐशी अगाध कीर्ति तुमची श्रीहरी ॥१॥ दीन आम्ही रंक वंदितों चरणा । सांभाळीं दीनांलागीं मानसमोहना ॥२॥
sola sahasra taten dvijalagin alin | amrutachi geli chavi tevhan
सोळा सहस्र ताटें द्विजालागीं आलीं । अमृताची गेली चवी तेव्हां ॥१॥ पक्कान्नाचा तरी वाढवूं विस्तार । होईल उशीर कथेलागीं ॥२॥
sola sahasra houn yeten | bharalen riten ahmapai
सोळा सहस्र होऊं येतें । भरलें रितें आह्मापै ॥१॥ ऐसे तुम्हां ठायाठाव । म्हणे देव संपादे ॥ध्रु.॥
sonvalaya nanv kshirasagar | vruthachi manjar gajarin
सोंवळया नांव क्षीरसागर । वृथाचि मांजर गाजरीं ॥१॥ काय तैसी तें वायाणें । लटिकीं भूषणें मिरविती ॥२॥
sovala to jhala | angikar deven kela
सोवळा तो झाला । अंगीकार देवें केला ॥१॥ येर करिती भोजन । पोट पोसाया दुर्जन ॥ध्रु.॥
sonvala houn ton vonvalen jadalen | sandimandi bolatondin bijin
सोंवळा होऊं तों वोंवळें जडलें । सांडीमांडी बोलतोंडीं बीजीं ॥१॥ एकसरीं केलीं कलेवरें साटी । आतां नका तुटी पायांसवें ॥ध्रु.॥
sonvalin piluni kan ghalishi | mudrenen ang kan ja-lishi
सोंवळीं पिळूनि कां घालिशी । मुद्रेनें आंग कां जा-ळिशी ॥१॥ कासया केली खोडी । काया विटंबिली बापुडी ॥२॥
sovalyanen hari vadhato sakalan | manincha kalavala kon jane
सोवळ्यानें हरि वाढतो सकळां । मनींचा कळवळा कोण जाणे ॥१॥ रुक्माईचे कानीं सांगितली गोष्ट । विस्तारावें ताट ज्ञानदेवा ॥२॥
sosiyeli ati garbhavas phere | ayudhanche bhare vagavitan
सोसियेली आटी गर्भवास फेरे । आयुधांचे भारे वागवितां ॥१॥ वाहोनि सकळ आपुलिये माथां । भार दासां चिंता वाहों नेदी ॥२॥
sosen bahugarbhavasin | melon ason upavasin | nahin sakhin aisin | tethen koni bhetalin
सोसें बहुगर्भवासीं । मेलों असों उपवासीं । नाहीं सखीं ऐसीं । तेथें कोणी भेटलीं ॥१॥ करीं करीं रे स्वहित । देह तंव हे अनित्य । नाहीं दिलें चित्त । सोडवूं मोहापासोनि ॥ध्रु.॥
sosen vadhe dosh | jala na palate kas
सोसें वाढे दोष । जाला न पालटे कस ॥१॥ ऐसें बरवें वचन । करितां तो नारायण ॥ध्रु.॥
sosen sosen marun haka | hoil chuka mhanauni
सोसें सोसें मारूं हाका । होईल चुका म्हणऊनि॥१॥ मागें पुढें क्षणभरी । नव्हे दुरी अंतर ॥ध्रु.॥
sosoni vipatti | jodi dili tujhe hatin
सोसोनि विपत्ती । जोडी दिली तुझे हातीं ॥१॥ त्याचा हाचि उपकार । अंतीं आह्माशीं वेव्हार ॥ध्रु.॥
sohan navhe nad | karnadvayacha bhed | laksha bhumadhya | navhen sohan
सोहं नव्हे नाद । कर्णद्वयाचा भेद । लक्ष भूमध्य । नव्हें सोहं ॥१॥ चवदा चक्रें बावन्न मात्रा । अकार उकार मकारा । यासी जाणें अर्धमात्रा । तेंचि सोहं ॥२॥