भजनी मालिका
← भजनांकडे परत

सोसें सोसें मारूं हाका । होईल चुका म्हणऊनि

sosen sosen marun haka | hoil chuka mhanauni

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सोसें सोसें मारूं हाका । होईल चुका म्हणऊनि॥१॥ मागें पुढें क्षणभरी । नव्हे दुरी अंतर ॥ध्रु.॥ नाम मुखीं बैसला चाळा । वेळोवेळां पडताळीं ॥२॥ तुका म्हणे सुखी केलें । या विठ्ठलें बहुतांसी ॥३॥